in

मुंबईतील राणीची बाग पुन्हा होणार सुरू

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील राणीची बाग गेले ११ महिने बंद होती. मात्र येत्या १५ फेब्रुवारीपासून ती पुन्हा होणार सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राणीची बाग सुरू करण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवासाची सुविधा सुरू झाल्यामुळे राणीबाग पर्यटकांसाठी खुली करण्यासंदर्भात पालिकेच्या माध्यमातून हालचाली सुरू आहेत.

याबाबतचा आराखडा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे. राणी बागेत नियमितपणे पाच ते सहा हजार पर्यटक येत असतात. तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या 15 हजारांपर्यंत जाते. आता कोरोनामुळे तिकीट खिडकीजवळ सुरक्षित अंतराचे मार्किंग करण्यात आले आहे. तर ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला पाच ते सहा हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. यापेक्षा जास्त पर्यटक आल्यास प्रवेश देणे बंद करण्यात येईल अशी माहिती राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे. त्यामुळे आता राणीच्या बागेत तयारी सुरु झालेली पाहायला मिळते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Price: पेट्रोल पुन्हा महागले; भाव काय?

कामत कुटुंब सुखावले; अखेर तीराच्या औषधावरील करमाफ