in

शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखावर खंडणीचा गुन्हा दाखल

वर्धा | भूपेश बारंगे : वर्धा जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुखावर आर्वी पोलीस ठाण्यात खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्वी पोलिसांनी निलेश देशमुखला अटक केली आहे.आर्वी ते कौडण्यापूर रस्त्याचे काम करणाऱ्या “शैलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ” च्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्वी अमरावती मार्गावर आर्वी ते कौडण्यापूर पर्यंतचे काम अमरावती येथील कंपनी करत असताना मुरूम टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. याच ठिकाणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख जाऊन रस्त्यावर मुरूम टाकणाऱ्या चार टिप्परला अडवून काम बंद करण्यास सांगितले आम्ही मंजूर करून आणलेल्या काम आहे यावरून एक लाखाची मागणी केली. या रस्त्यावर तुम्हाला काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागेल नाही तर तुम्हाला काम करू देणार नाही.

यावेळी ही माहिती सुपरवायझर ला कळली असता अनिकेत वसू व सचिन धांडगे घटनास्थळी पोहचले यावेळी निलेश देशमुख यांनी रस्त्याचे बांधकाम बंद करा असा सुलतानी आदेश दिला.मला जोपर्यंत एक लाख देणार नाही तोपर्यंत तुम्हाला काम करत येणार नाही अशी तंबी देत शिवीगाळ करण्याचा आरोप केला. याबाबत आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून निलेश देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखाची दादागिरी

आम्ही मंजूर केलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी आम्हाला एक लाख द्यावे त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करावे. ‘पैसे न मिळाल्याने रस्त्याचे काम थांबवणे ही कुठली नीती’. आर्वी कौडण्यापूर रस्त्याचे सुरू असलेले काम तात्काळ थांबवून काम बंद करण्यात यावे अशी दादागिरी निलेश देशमुख यांनी करण्यात आली यावरून आर्वी पोलिसात खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेता करण मेहराला अटक

एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध देणार; स्वामी रामदेवांचा मोठा दावा