in

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती; दोन पीएसआयसह पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन

बेकायदेशीररित्या झडती घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली

जालना लोकसभेचे खासदार तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. बेकायदेशीररित्या झडती घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी जाफराबाद येथील दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची जाफराबाद पोलिसांकडून (Jafrabad Police) बेकायदेशिररित्या झाडाझडती घेण्यात आली.त्यावेळी कार्यालयात उपस्थित प्रमुखांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता या पोलिस कर्मचाऱ्यांनी जबरदस्ती विकास कामांचा डेटा आणि काही कागदपत्र सोबत घेत कार्यालयात नासधूस केली. त्याचबरोबर घाणेरड्या भाषेत शिविगाळ करत कार्यकर्त्यांना धक्काबुकी केली.

या प्रकरणी पोलिस खात्यानं झाडाझडतीचा खुलासा करावा अशी तक्रार निवेदनाद्वारे दानवे यांनी पोलिस अधिक्षकांना केली होती. त्याचबरोबर पोलिसांच्या या झाडाझडतीनं जनमानसातली प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या सर्व पोलिसांच्या निलंबनाची मागणी दानवे यांनी केली होती.त्यानुसार या कारवाईत सहभागी असलेले पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल आणि युवराज पोठरेंसह पाच पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रतिमा मलिन होण्याचा ठपका ठेवत पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं; २४ तासांत एकाही कोरोना रुग्णाची नोंद नाही

साताऱ्याच्या खंबाटकी घाटात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह