in ,

Rashmi Rocket Review ; खेळांमधील ‘जेंडर टेस्ट’ला वाचा फोडणारा ‘रश्मी रॉकेट’…

आपल्यापैकी अनेकांना माहिती ही नसेल की, खेळांमध्ये लिंग चाचणी सारखी गोष्ट आहे. चित्रपट निर्माते आकाश खुराना यांनी त्यांच्या ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटात हा सामाजिक मुद्दा उपस्थित केला आहे. तापसी पन्नू, सुप्रिया पाठक, प्रियांशु पैन्युलीसारख्या अभिनेत्यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट एका गुजराती मुलीची कथा आहे.

हा चित्रपट एका गुजराती मुलीची कथा आहे, जी जागतिक खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहते. तिच्या स्वप्नाचा पाठपुरावा करत असताना, तिला समजते कि, लिंग चाचणीच्या नावाखाली महिला खेळाडूंना शोषणाचा सामना करावा लागतो. या निर्मात्यांनी इतका संवेदनशील विषय उचलण्याचे धाडस दाखवले आहे, जो बराच काळ वादाचा विषय राहिला आहे. चित्रपटाची कथा नक्कीच एका सशक्त थीमवर बांधली गेली आहे, परंतु त्याचा पहिला भाग जास्त प्रमाणात नाट्यमय केला गेला आहे.

याशिवाय मनोज जोशी आणि सुप्रिया पाठक यांच्या अभिनयाला तोड नाही. या व्यतिरिक्त वरुण बडोला, श्वेता त्रिपाठी आणि आकाश खुराना आपापल्या पात्रांना न्याय देतात. हा चित्रपट आपल्याला भारताची वेगवान धावपटू दुती चंदची आठवण करून देतो, ज्यांना लिंग चाचणीत नापास झाल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

T20 World Cup Schedule: टीम इंडियाची प्रत्येक मॅच आहे खास, पाहा संपूर्ण वेळापत्रक

“परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात”, रोहित पवार राज्य सरकारवर आक्रमक