in

फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल : ‘त्या’ काळात पोलिसांच्या बदल्या झाल्याच नाहीत! रश्मी शुक्लांवर ठपका

फोन टॅपिंग प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणाचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्य शासनाला सादर केला आहे. या अहवालातून धक्कादायक तथ्य समोर आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणात जो कालावधी नमूद करण्यात आला आहे, त्या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालात रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. फोन टॅपिंग कायद्याचा गैरवापर करत शासनाची दिशाभूल केली असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करून एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याचाच आधार घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

तर दुसरीकडे, फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांची माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारनेही सहानुभूती दाखवत शुक्ला यांना मोठ्या मनाने माफ केले. याचाच गैरफायदा त्यांनी घेतला, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या सर्व प्रकरणाचा अहवाल देण्यास सीताराम कुंटे यांना शासानाने सांगितले होते. त्यानुसार कुंटे यांनी हा अहवाल दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा रश्मी शुक्ला यांचा अहवाल उघड केला, तेव्हा पेनड्राइव्हमधील डेटा उघड झाल्याची बाब समोर आली. मात्र, शासनाला हा अहवाल प्राप्त झाला होता. तेव्हा त्यासोबत हा पेनड्राइव्ह नव्हता. प्रसारमाध्यमात उघड झालेल्या अहवालाची प्रत पाहता ती रश्मी शुक्ला यांच्याकडे असलेल्या ऑफिस कॉपीची प्रत आहे. त्यामुळे ती प्रत त्यांच्याकडूनच लीक झाली असा संशय आहे. हा संशय सिद्ध झाल्यास रश्मी शुक्ला यांच्यावर कठोर कारवाईस पात्र ठरतील.

काय आहे या अहवालात –

  • 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान 167 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यापैकी 25 फेब्रुवारी ते २६ जून 2020पर्यंत 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या
  • चार अपवाद वगळता इतर सर्व बदल्या पोलीस आस्थापना मंडळ-1च्या शिफारशीनुसार करण्यात आल्या
  • 27 जून ते 1 सप्टेंबर 2020पर्यंत आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत
  • जुलै 2020मध्ये रश्मी शुक्लांनी इंडियन टेलिग्राफ अॅक्ट अन्वये सार्वनिक सुव्यवस्थेला धोक्याच्या कारणासाठी जाणीवपूर्वक दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत 5504 नवे रुग्ण, पालिका म्हणते घाबरण्याचे कारण नाही

Corona Virus : राज्यात उद्रेक वाढला, 35,952 नवे रुग्ण; मृतांचा आकडाही शंभरच्या पुढे