in

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांच्या समर्थनार्थ रास्ता रोको

पोलिसांचा आदेश झुगारून राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी एक्सप्रेस वे अडविला

सुशांत डुंबरे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या साखर कारखान्यांवर तसेच त्यांच्या निकटवर्तीयांवर सध्या सुरू असलेल्या छापेमारीच्या निषेधार्थ मावळ राष्ट्रवादी काँग्रेस कडून आज पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोको करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळ पासूनच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र मागील अर्धा तासापासून पुणे मुंबई एक्सप्रेस वे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक्सप्रेस वे अडविला.

दरम्यान या प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. “केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैर वापर करत आहे आणि हे यापूर्वी कधी ही पाहायला मिळालेले नाही. सर्वच कुटुंबियांवर अशा धाडी टाकणे योग्य नही..” असे त्यांनी म्हंटलं आहे.

कॉर्डीला कृझ ड्रग्ज प्रकरण
या वेळी आर्यन खान प्रकरणाबाबत पण त्यांनी आपलं मत व्यक्त कालं आहे. किरण गोसावी आणि भाजप पदाधिकारी मनीष भानुशाली उपस्थित असणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. पुण्यतील फसवणूक प्रकरणात किरण गोसावी यांना अजून अटक केली नसल्याचं ही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ड्रग्ज प्रकरण : भाजपा नेत्यांच्या आदेशावरून ३ आरोपींना एनसीबीनं सोडलं; नवाब मलिकांचा गंभीर दावा

का साजरा केला जातो नवरात्री उत्सव? जाणून घ्या काय आहे महत्त्व