in

Mucormycosis; राज्य सरकारकडून म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित!

राज्यात कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने म्युकरमायकोसिसवर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिले आहेत. निश्चित दरांपेक्षा जास्त दर कोणत्याही रुग्णालयाला आकारता येणार नाहीत अशी तंबीही दिली आहे.

राज्यभरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. मात्र खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचारांसाठी काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिलं आकारत असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानुसार राज्यभरात म्युकरमायकोसिसवर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना या आजाराच्या उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिलेत. तसेच निश्चित दरांपेक्षा जास्त दर कोणत्याही रुग्णालयाला आकारता येणार नाहीत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे असा प्रकारांना आळा बसणार आहे.

दरम्यान, कोणत्या श्रेणीमध्ये कोणती शहरं किंवा भाग येतात, यानुसार दरांची कशी वर्गवारी असणार आहे, ती पाहूयात…

दरआकारणी

वॉर्ड आणि आयसोलेशनची सुविधा : अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ४ हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ३ हजार रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी २ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

आयसीयूशिवाय फक्त व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन : अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ७ हजार ५०० रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ५ हजार ५०० रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी ४ हजार ५०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन : अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ९ हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ६ हजार ७०० रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी ५ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

शहरांची वर्गवारी

अ श्रेणी मुंबई विभाग (मुंबई महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उल्हासनगर महानगर पालिका, अंबरनाथ महानगर पालिका, कुळगाव बदलापूर महानगर पालिका, पनवेल महानगर पालिका)

पुणे विभाग (पुणे महानगर पालिका, पुणे कँटोनमेंट, खडकी कँटोनमेंट, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, देहूरोड कँटोनमेंट, देहू सीटी)

नागपूर विभाग (नागपूर महानगर पालिका, दिगडोह सीटी, वाडी सीटी)

ब श्रेणी : नाशिक (नाशिक महानगर पालिका, एकलहरे, देवळाली कँटोनमेंट, भगूर नगरपरिषद), अमरावती महानगर पालिका, औरंगाबाद (महानगर पालिका आणि कँटोनमेंट), भिवंडी (महानगरपालिका आणि खोनी), सोलापूर महानगर पालिका, कोल्हापूर (महानगर पालिका आणि गांधीनगर), वसई-विरार महानगर पालिका, मालेगाव (महानगर पालिका, धायगाव, दरेगाव, सोयगाव, द्याने, मालदा), नांदेड महानगर पालिका, सांगली (सांगली-मिरज कुपवाड महानगर पालिका, माधवनगर)

क श्रेणी : अ आणि ब गट वगळता सर्व भाग

शस्त्रक्रियासाठीचे दर

म्युकरमायकोसिस आजारात राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित आहे. अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तराफा दुर्घटना | ONGC चे 3 कार्यकारी संचालक निलंबित

Tokyo Olympic; कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल