in ,

Ratnagiri | गुहागर तालुक्यात पावसाने केले भात शेतीचे नुकसान

मुंबईत पावसाने पाठ फिरवली असली तरी कोकणात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते.रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पावसामुळे देवघर गावात शेतकऱ्याचे भरपुर नुकसान झाले. कोरोना काळात जगणे नको झालेल्या शेतकऱ्याच्या पदरी शेवटी निराशाच आली.

देवघर गावात नविन महामार्गाचे काम झाले त्यामुळे पाण्याचा ओढा गावात शिरला आणि भातशेतीचे नुकसान करुनच थांबला. सर्व नुकसान नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणच्या रस्त्याच्या कामामुळेच झाले असा आरोप गावकऱ्यांनी केला.

गुहागर -विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग देवघर या गावातुन जातो. त्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने रस्त्याशेजारी असणारी जुन्या घरातमध्ये गटाराचे पाणी जाऊन घरांमधील सामानचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सुद्धा याच घरांमध्ये या रस्त्याशेजारी असणाऱ्या गटाराच्या पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न केल्याने पाणी घुसले होते.

यावर्षी सुद्धा हीच परिस्थिती उद्भवल्याने येथील नागरिकांनी आता जगायचे कसे? असा प्रश्न विचारला असता याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे चिपळूण येथील अधिकारी श्री मराठे यांना विचारले असता आम्ही संबंधित ठेकेदाराला तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे त्यामुळे तुम्ही ठेकेदाराकडून काम करून घ्या असे उत्तर आले.त्यामुळे या परिसरातील नागरिक संतापले असून वेळीच याची दखल न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गुहागर -विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला गटारांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साठते. त्यामुळे हे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते.घरात पाणी जाऊन नुकसान झाले असुन नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचे दोन्ही स्वीय्य सहाय्यक ‘ईडी’च्या कोठडीत

गुलजार यांच्या भेटीनंतर नीना गुप्ता झाल्या ट्रोल