महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा कहर पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. क्वारंटाईन असलेल्या बाधित रुग्णांवर आता मुंबई पालिका प्रशासनाचं लक्ष असून सांताक्रूझच्या एका हॉटेलमधून क्वारंटाईन केलेले काही प्रवासी पळून गेल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत आता कठोर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
लक्षणं नसलेल्या आणि होम-क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना पालिका दिवसातून चार ते पाच वेळा कॉल करून ते घरी असल्याची खातरजमा करणार आहे. बधितांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे किंवा त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे आणि आता पून्हा होम-क्वारंटाईन केलेल्या रुग्णांच्या हातावर पून्हा शिक्का मारण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासन सध्या अँक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पालिकेने हे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे. पालिकेचे विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्या बाधित रुग्णांवर वॉर-रूम मार्फत गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियाही होणार आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला असताना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन मुंबई पालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडून केलं जात आहे.
Comments
Loading…