in

रेड लाईट एरिया आणि कँमेरा…

प्रदीप कापसे : कॅमेरा हा तसा सगळ्यांच्या आवडीचा विषय कँमेरा समोर आला की नाही तशी धडपड सुरु होते ती म्हणजे कॅमेऱ्यात दिसलं पाहिजे पण तसं काही मला आज जाणवलं नाही त्याचं कारण असं की पुण्यातल्या रेड लाईट एरियात आज स्टोरीसाठी गेलो होतो तसं रेड लाईट एरियात कॅमेऱ्यात शुट घेणं म्हणजे महत्प्रयासाचं काम आहे कारण इथल्या महिला लगेच अंगावर येतात.

तसा बुधवार पेठचा परिसर हा कंन्टेंमेटं झोन मध्ये येत होता आणि आजही आहे कारण महापालिकेनं सील केलेल्या पेठांच्या भागात याचा समावेश होतो मात्र या पेठेत कोरोनाचा एकही रुग्ण नाही ! हे मात्र विशेष आहे कारण इथल्या जून्या इमारती , लाकडांची माळवद आणि खूप जूनी घरं आसा हा वेश्या वस्तीतला परिसर आहे मात्र आज स्टोरीला जाताना एकटं जायला भीती नव्हती मात्र तिथली परिस्थिती कॅमेऱ्यात घेणं अवघड होतं त्यामूळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील कर्मचारी महिलांना सोबत घेतलं आणि परिसरात फेरफटका मारला नकळतपणे कँमेऱ्यात तिथलं शुटही केलं कारण या परिसराततं कॅमेऱ्यात शुट घेणं खरंच जोखमीचं काम आहे.

कदाचित या महिला काय विचार करत असतील माहित नाही पण त्यांचा विचार मात्र मनाला पटला तो म्हणजे आपण वाईट काम करतोय याचं भांडवल का करावं. आपल्या परिस्थितीनं आपण यात ओढलो गेलो मात्र कॅमेऱ्यात आपला चेहरा लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी केवढी धडपड ! मात्र या कोरोनामुळे सगळा त्यांचा धंदा बंद झाला सगळ्यांच्याच चेहऱ्यावर निराशा होती…मात्र दाखवतं कोणी नव्हतं…आलंय ते भोगल्याशिवाय पर्याय नाही अनेकांना विनवणी केली की बोला मात्र एकही महिला बोलायला तयार झाली नाही तेव्हा समजलं की, कॅमेऱ्यात दिसलंच पाहिजे अथवा बोललंच पाहिजे असं काही नाही पडद्याआडचं जगणं पडद्याआडचं बरं ते पडद्यावर यायला नको अशी यांची भावना असेल.

या ठिकाणी कॅमेऱ्याची लेन्स बंद करावी लागली मात्र डोळ्यातल्या लेनसमध्ये बरेचसे अँगल कैद झाले आणि ते तसंच डोळ्यासमोर तरळत राहतील ते म्हणजे संस्थांची लोक येताचं धान्याचं किट घेण्यासाठी होणारी गर्दी, अशिक्षितपणा, काहीचं वय संपून गेलं म्हणून त्यांच्याकडे न येणारे कस्टमर्स त्यांची बोलकी प्रतिक्रिया , आपली आई काय करतेय ? याच भावनेनं मुलांना काय वाटतं असेल हा केलेला विचार , चार महिने बंद असलेला धंदा आणि धंदा बंद असल्यानं पोट बंद पडण्याची आलेली वेळ, आणि पुढे काय ? लोकांच्या मनात कोरोनाची भीती अशीच राहिली आणि कस्टमर्स आलेचं नाहीत तर करणार काय ? या भावनेनं मन थोडं विचारात गेलं.मात्र खरंच ही परिस्थिती भयंकर आहे.

माणूस शारीरीक भूकेची गरज पुर्ण करू शकतो मात्र मनाची भूक कोण भागवणार ? या बायकांना तर इथं आधारं देणारंही कोणी नाही त्यांच्या मनातली घालमेल कोण दूर करणार ? सरकार यांंना मदत करणार का ? असे अनेक प्रश्न आहेत मात्र ते सगळे प्रश्न कॅमेऱ्यासमोरचं मांडले तर सुटतील असं नाही तर पडद्यामागची बाजूही समजून घेणं गरजेचं आहे आणि जर नाही समजून घेतलं तर मगं यांच अवघड आहे.

बुधवार पेठेतल्या 2 हजार महिलांवर खरंच वाईट परिस्थिती आलीये काही गल्ल्या सोडून बायका गावी गेल्यात आता व्यवसाय सुरु होताचं त्याही परत येतील मात्र आल्यावर कस्टमर्सच आले नाहीत तर करणार काय ? याचं उत्तर कोणाकडेच नाही.मात्र काही ठिकाणी नाइलाजाने जरी आपला हातातला कॅमेरा बंद करावा लागला तरी डोळ्यांचा कॅमेरा मात्र बरेचं काही कैद करून घेतो आणि नंतर बेचैन करून सोडतो एवढं मात्र नक्की आहे.

त्यामूळे रेड लाईट एरियात कॅमेरा घेऊन जाण्यापेक्षा डोळ्यांच्या कॅमेऱ्यात तिथलं भयाण वास्तवं साठवायची तयारी असेल तरंच जावं असं मला तरी वाटतं कारण आपल्या कॅमेऱ्याकडेही त्याचं उत्तर नाही एवढं मात्र नक्की.पत्रकारिता पदरात काय पाडू अथवा न पाडो मात्र अनूभवाचं दान मात्र पदरात पाडेल एवढं मात्र नक्की आहे आणि हा अनूभव डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून कधीच डीलीट होणार नाही.

See

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गगनयानचे बुस्टर तयार.. वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविले गगनयानचे बुस्टर..

सिडनी टेस्टपूर्वी भारताला मोठा धक्का