in

फक्त 15 मिनिटांत चार्ज होणारा ‘हा’ स्मार्टफोन

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने आत्तापर्यंत Redmi Note 11 सिरीज असलेल्या 10 लाखांपेक्षा अधिक स्मार्टफोनची विक्री केली आहे. त्यानंतर आता कंपनीनं Redmi Note 11 Pro+ या स्मार्टफोनच्या (redmi note 11 Pro+ specifications) जबरदस्त Battery Performance बद्दल माहिती दिली आहे.

शाओमीने Weibo पोस्टमध्ये या स्मार्टफोनबद्दल माहिती देताना म्हटलंय की, ‘जेव्हा तुम्ही फुटबॉल खेळत असता तेव्हा तुम्ही एक सेकंदही मिस करू शकत नाही. रेडमी नोट 11 प्रो+ हा स्मार्टफोन याच Half Time चा फायदा घेऊ शकतो. Redmi चे General Manager लू वेइबिंग यांनी दुसऱ्यांदा पोस्ट करत 15 मिनटांमध्ये हा स्मार्टफोन फुल चार्ज होऊ शकतो असा दावा केला आहे.

Redmi Note 11 Pro+ हा स्मार्टफोन Note 11 सीरीजचा टॉप मॉडेल मानला जातो. कारण त्यात 120W चा फास्ट चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेल्या 4500 MAH बॅटरीला चार्ज करण्यासाठी केवळ 15 मिनटांचा वेळ लागतो. Two Charging Mode चा सपोर्ट असणार आहे.

हा स्मार्टफोनमध्ये Fast Charge Protection, बिल्ट-इन सेफ्टी Identification चिप, Short-Circuit Protection, ओवर-व्होल्टेज प्रोटेक्शन आणि ओवर-टेम्परेचर प्रोटेक्शनचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये Two Charging Mode चं फीचरही देण्यात आलं आहे. यामध्ये 108MP चा अल्ट्रा-क्लियरचा मुख्य कॅमेरा आणि 3.5 MM चा हेडफोन जॅक देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये NFC, इन्फ्रारेड आणि Wi-Fi 6 चं ही फीचर्स देण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Amaravati Voilence | पोलिसांच्या विनंतीमुळे अमरावती दौरा पुढे ढकलला : किरीट सोमय्या

राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर