लोकशाही न्यूज नेटवर्क | राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आदोलकांना आंदोलनजीवी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर आता राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “देशात नवी आंदोलनजीवी जमात अस्तित्वात आली आहे. हे आंदोलनजीवी लोक उठून-सुटून कुठल्याही आंदोलनांमध्ये सहभागी होत असतात. एका विशिष्ट हेतूने आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्याचा शेतकरी आंदोलकांसह कॉंग्रेस नेत्यांनी विरोध केला आहे.
दोन-चार भांडवलदार जीवलग मित्रांसाठी (crony) काम करत आहेत, असा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे.हाच धागा पकडत राहुल गांधी यांनी crony जीवी है जो, देश बेच रहा है वो अशी टीका त्यांनी ट्विटरवरून केली.
पुढील वर्षी खासगीकरणातून पावणेदोन लाख कोटी उभारण्याचे लक्ष्य असून, त्यातील एक लाख कोटी रुपये बँका व वित्तसंस्थांच्या खासगीकरणातून येणार आहेत आणि ७५ हजार कोटी रुपये केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांच्या (सीपीएसयू) निर्गुंतवणुकीतून प्राप्त होणार आहे, या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.
कॉंग्रेसचे नेते याचं मुद्द्यावरून मैदानात उतरले आहेत. त्यातच आज पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘मला आंदोलनजीवी असल्याचा अभिमान आहे. महात्मा गांधी हे देखील एक आंदोलनजीवी होते” असं त्यांनी म्हटलं आहे.
Comments
Loading…