in

Rekha Jare case; मुख्य आरोपी बाळ बोठेला कोर्टाचा दणका

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला फरार घोषित करण्यात आले आहे. खुनाला तीन महिने उलटून सुद्धा बोठेचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिसांनी कोर्टात फरार घोषित करण्याचा अर्ज केला होता. हा अर्ज कोर्टाने मंजूर करून बोठेला दणका दिला आहे.

पोलिसांनी बाळ बोठेला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी गुरूवारी हा अर्ज मंजूर केला. त्यामुळे आता आरोपी बोठे याला कायदेशीररित्या फरार घोषित करण्यात आले आहे.

पोलिसांसमोर हजर झाला नाही तर त्याची संपत्ती जप्त होऊ शकते. यासाठी त्याला एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच फेटाळला आहे. पारनेर न्यायालयाने यापूर्वी बोठेविरूद्ध स्टँडिंग वॉरंट काढले होते. त्याला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तो अर्जही फेटाळण्यात आला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ease of Living Index : केंद्राच्या यादीत मुंबईच्या तुलनेत पुणे टॉप

वेबसीरिजचे स्क्रीनिंग गरजेचे – सुप्रीम कोर्ट