in

स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओची बाजी

पाच वर्षांत प्रथमच होत असलेल्या दूरसंचारमधील स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओने यामधील सर्वात मोठा हिस्सा विकत घेतला आहे. त्यामुळे रिलायन्सने स्पेक्ट्रमध्ये मोठा ठसा उमटविला आहे. यामध्ये केंद्र सरकारला तब्बल ७७,८१४.८० कोटी रुपये मिळाले आहेत.

२,२५० मेगाहार्टझ स्पेक्ट्रम हे दूरंसचार संदेशासाठी सात बँडमध्ये वापरले जातात. या स्पेक्ट्रमचे लिलाव प्रक्रियेकरिता कंपन्यांसाठी २,२५० मेगाहर्ट्झचे परवाने उपलब्ध करून देण्यात आले होते. या स्पेक्ट्रमची ४ लाख कोटी रुपये राखीव किमतीने सोमवारी विक्रीला सुरूवात झाली होती.

८५५.६० मेगाहार्टझ स्पेक्ट्रम हे दोन दिवसांच्या लिलावामध्ये ७७,८१४.८० कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. यामध्ये स्पेक्ट्रम हे रिलायन्स जिओने ५७,१२२.६५ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.भारती एअरटेलने ध्वनीतरंग हे १८,६९९ कोटी रुपये आणि व्होडाफोन आयडियाने ध्वनीतरंग हे १,९९३.४० कोटी रुपयांना विकत घेतले असल्याची माहिती दूरसंचार विभागाचे सचिव अंशू प्रकाश यांनी दिली.

महसूलात घट
स्पेक्ट्रम लिलावात ४ लाख कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र महसूल कमी मिळाला आहे. दुसऱ्या मेगाहार्टझमध्ये पर्याय उपलब्ध असल्याने ७०० मेगाहार्टसाठी कंपन्यांनी तयारी दाखविली नाही. ७०० मेगाहार्टझची किंमत जास्त असल्याने कोणीही खरेदीची तयारी दाखविली नसल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे,

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूकच…राहुल गांधींचे मोठे विधान

Corona Vaccination | मुंबईतील ‘या’ 29 खासगी रुग्णालयांतही कोरोना लसीकरण