in ,

वैनगंगेचा काठावर मौर्य कालीन वास्तुचे अवशेष; उत्खननाची होतेय मागणी

अनिल ठाकरे,चंद्रपुर | पुरातत्वशास्त्राचा अभ्यासकांना वैनगंगेचा काठावर मौर्य कालीन वास्तुचे अवशेष सापडले आहेत. आकाराने गोल असलेल्या या वास्तुचे बांधकाम विटांचे आहे. या परिसरात लोकवस्ती अस्तित्वात असल्याच्या अनेक खानाखुना आढळल्या आहेत. सापडलेले अवशेष मौर्य कालीन असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे .

या भागाचे उत्खनन झाल्यास गडचिरोली-चंद्रपूरचा प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडू शकतो,अशी शक्यता अभ्यासक निलेश झाडे यांनी वर्तविली आहे.चंद्रपूर जिल्ह्याचा सिमावर्तीत भागात येणाऱ्या चपराळा येथील वैनगंगेचा काठावर मौर्यकालीन वास्तुचे पुरावे सापडले आहेत. वैनगंगेचा काठावर असलेल्या धान शेतीत गोलआकाराची ही वास्तु आहे.या वास्तुचे बांधकाम विटांचे असून मौर्य काळात आढळून येणाऱ्या विटांसारख्या या विटा अहेत. या वास्तुचा परिसरात मातीच्या भांड्यांची तुकडे आढळली आहेत.आढळलेल्या विटांच्या वास्तुवर विरगड शिल्प, गणेश शिल्प, शिवलींग अशा आकृत्या आहे.

मौर्य,सातवाहन,वाकाटक, चालुक्य,राष्ट्रकुट राजवटीत चपराळा मोठे शहर असावे,असा अंदाज झाडे यांनी लावला आहे.प्राचीन काळापासूनच वैनगंगा नदी पवित्र मानली गेली आहे.वैनगंगेच्या काठावर ही वास्तु असल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.सापडणारे अवशेषावरून चपराळातील वास्तु बौध्द स्तुप असावा ,असा तर्क झाडे यांनी काढला आहे.

पुर्वी नदीच्या मार्गाने व्यापारी दुरवरून प्रवास करीत असतं.अश्या प्रवाशाचां विसाव्यासाठी वैनगंगेचा काठावर त्याकाळी अनेक शहरे वसली होती आणि ती शहरांचा मोठ्या बाजारपेठांमध्ये समावेश होता.चपराळ्यातील वास्तुचे उत्खनन झाल्यास अनेक बाबीवर प्रकाश पडू शकतो.त्या वास्तुचा आकार तसेच सापडलेल्या विटांचा आकारमान बघता ती बौध्द धम्माशी निगडीत वास्तु असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सरकारच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून बीड जिल्ह्याचे नाव वगळले

महाराष्ट्रात सापडले यूपी-एमपीचे गावठी कट्टे