in

रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनच ग्लोबल टेंडर काढणार- राजेश टोपे

राज्याला मागणीच्या तुलनेत रेमडेसिव्हीर मिळत नाही आहे. रेमडेसिव्हीरचा पुरवठा अधिक व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.यासाठी रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनच ग्लोबल टेंडर काढणार आहोत. इस्त्राईल, युरोपियन देशातून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

लस आणि रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आलं आहे. राज्यात रेमडेसिव्हीर साडे तीन लाखांपर्यंत उपलब्ध होतील. सध्या आपण 40 हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मागणी केली होती. पण आपल्याला 20 हजार कॉनस्ट्रेटर उपलब्ध होतील.

देशापेक्षा महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट जास्त

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटतेय मात्र त्याचवेळी दुसरीकडे 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे हेण्याचं प्रमाण चांगलं आहे. राज्यात 84.7 टक्के रिकव्हरी रेट आहे. तसेच देशाच्या रिकव्हरी रेटपेक्षा महाराष्ट्राचा रेट जास्त आहे असल्याचा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात पॉझिटिव्हीटी रेट 27 वरुन 22 टक्क्यांवरुन आला आहे. राज्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन नर्स नेमण्याचं आपण ठरवलं आहे. तसेच ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजनचे लिकेज थांबवणे, प्लांटची तपासणी करण्याचं ठरवलं आहे. ऑक्सिजन जनरेटरच्या संदर्भात आपण 150 पेक्षा जास्त प्लांटची ऑर्डर दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात 60 पेक्षा अधिक दुकाने सील

‘पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा’