in ,

पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा; निवडणूक आयोगाचा आदेश

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. राज्यात आचरसंहिता लागू आहे. आता निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदींचे फोटो असलेले सरकारी योजनांचे होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले आहेत. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणं आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून हा आदेश देण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसने कोरोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच करोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही ७२ तासांत हटवण्यास सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

India vs England 4th Test | इंग्लंडचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

डॉक्टरचा कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; औरंगाबादमध्ये खळबळ