in

भाजपा जिल्हाध्यक्ष गोडेंचा राजीनामा नाट्य

दोनदा पत्रकार परिषद केली रद्द

भूपेश बारंगे, वर्धा
वर्ध्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पक्षावरच्या नाराजीतून आपला राजीनामा भापजा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगू लागली. याच राजीनाम्यावर गोडे यांनी पत्रकार परिषद घेण्यासाठी सर्व माध्यमांना बोलविले सुध्दा मात्र अचानक पत्रकार परिषद रद्द झाल्याचे सांगून पत्रकाराना परतावे लागले. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत घेण्यात येईल असे सांगितले मात्र तीही पत्रकार परिषद रद्द झाल्याने भाजपच्या जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी ‘राजीनामा स्टंट’ म्हणून नाटकाचा खेळ केल्याचे दिसत आहे.

भाजपा पक्षावर नाराज असलेल्या जिल्हाध्यक्षांची वरिष्ठांकडून मनधरणी करावी लागली. येणाऱ्या नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका काही महिण्यात होण्याची शक्यता आसल्यामुळे भाजपा पक्षाला वर्धा जिल्ह्यात फटका बसून इतर पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून गोडेंची मनधरणी करण्यात आली.

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ शिरीष गोडे हे अनेक वर्षांपासून भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत, आताही आहे. उत्तरप्रदेशात लखमीपुरात झालेल्या घटनेने त्यांना धक्का पोहचल्याने हे पाऊल उचलावे लागले अशीही चर्चा आहे. मात्र ही चर्चा खरी की आपल्या राजकीय बेत शिजवण्यासाठी स्टंट आहे हे की काय, हे अद्यापही कळू शकते नाही.

पत्रकार परिषदेची माहिती घेण्यासाठी Lokशाहीने विचारणा केली असता त्यावर मात्र डॉ.शिरीष गोडे काहीच बोलू शकले नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लोकशाही इम्पॅक्ट : मुख्यमंत्र्यांकडून बातमीची दखल; ‘त्या’ आंदोलकांची घेणार भेट

साताऱ्यात भरदिवसा खून