in

डॉ. आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठाच्‍या कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा

रायगड जिल्‍हयातील लोणेरे येथील डॉक्‍टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदाला रामा शास्त्री यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे . प्राध्‍यापक अनिरूदध पंडित यांच्‍याकडे  कुलगुरूपदाचा अतिरिक्‍त कार्यभार देण्‍यात आला आहे.

डॉ शास्त्री यांनी राजीनामा देताना व्‍यक्‍तीगत कारण पुढे केले आहे. परंतु विद्यापीठातील त्‍यांचा मनमानी कारभार यामागचे प्रमुख कारण असल्‍याचा दावा विद्यापीठाच्‍या कार्यकारी परीषदेचे शासन नियुक्‍त सदस्‍य श्रीनिवास बेंडखळे यांनी केलाय . डॉ. शास्त्री यांना लोणेरे येथील वातावरण रूचत नसल्‍याने कुलगुरूंचे कार्यालय आणि निवासस्‍थान पुणे येथे हलवण्‍याचा हेतू होता. तसेच विद्यापीठात फर्निचर खरेदी करताना अव्‍वाच्‍या सव्‍वा खर्च करण्‍यात आला होता त्‍यालाही कार्यकारीणीच्‍या बैठकीत आक्षेप घेण्‍यात आला . ज्‍या फायनान्‍स ऑफीसरने या खर्चावर आक्षेप घेतला त्‍याची बदली करून त्‍याचे कार्यालय सील करण्‍यात आले त्‍यामुळेच सास्‍त्री यांना कुलगुरू पद सोडावे लागले असा दावा देखील श्रीनिवास बेंडखळे यांनी केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केडीएमसीच्या कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

कोणत्याही परिस्थितीत ‘हा’ शुल्क भरणार नाही ; औरंगाबादमधील व्यापाऱ्यांचा पवित्रा