in

नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत निर्बंध कायम

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागपुरात ७ मार्चपर्यंत लावण्यात आलेले होते, मात्र आता हे निर्बंध १४ मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने या संदर्भात आदेश जारी केला आहे.

संबंधित कालावधीत शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील, तसेच शनिवार व रविवारी दुकाने, प्रतिष्ठाने, हॉटेल रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश पूर्वीप्रमाणेच कायम राहील. प्रशासनाला पूर्ण लॉकडाऊन लावायचा नाही. त्यामुळेच काही निर्बंध लावून कोरोनाला नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. १४ तारखेपर्यंत निर्बंध वाढविण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी आदेश जारी केले आहेत.

साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कुणीही नियमांचे उल्लंघन केले, तर त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. सोबतच पोलीस कारवाईही होईल.

  • या काळात धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी राहील.
  • सभागृह, मंगल कार्यालय, लॉन आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न समारंभावर बंदी राहील.
  • कोणत्याही भागात आठवडी बाजार १४ पर्यंत बंद राहतील.
  • सर्व बाजार शनिवार-रविवारी बंद राहतील. (अत्यावश्यक सेवा, वर्तमानपत्र, दूध, भाजीपाला, औषधी व पेट्रोल पंपसोडून) यावेळी सिनेमागृह व नाट्यगृहही बंद राहतील.
  • हॉटेल-रेस्टोरेंट, उपहारगृह, दुकान व अन्य प्रतिष्ठान दररोज ५० टक्के क्षमतेसह रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी राहील. हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये रात्री ११ वाजेपर्यंत होम डिलीव्हरीची सुविधेसाठी किचन सुरू ठेवले जातील.
  • शहर सीमेतील सर्व वाचनालय, अभ्यासिका कक्ष ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येईल.
  • स्वीमिंग पूल आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन बंद राहतील. नियमित सराव करण्यास मात्र अटी व शर्तींच्या अधीन राहून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन प्रकरण; पत्नी विमल यांचा ‘तावडे’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख…

कोरोनामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील यात्रा रद्द