in

भिवंडीत उड्डाण पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहनचालकांचे जीव धोक्यात

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्व.राजीव गांधी उड्डाणंपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
राजीव गांधी उड्डाणपूल हा सुरुवातीपासून नादुरुस्त असल्याने त्याच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाला भगदाड पडल्याने तो अवजड वाहनांसाठी बंद केला होता. या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे 7 कोटी रुपये मंजूर झाले.

परंतु फक्त धामणकर नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली व त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली असून या उड्डाणपुलावार मोठं मोठाले खोल खड्डे पडल्याने  या उड्डाणपुलावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी व हलक्या वाहनांची ये-जा करणारे वाहनचालक मेटाकुटीला आले असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

WTC Final 2021 IND vs NZ | मोहम्मद शमीनं दाखवली आपली जादू

उंदराने कुरतडले पेशंटचे डोळे… मुंबईतील सरकारी रुग्णालयात खळबळ