लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने पहिल्याच डावात शतक झळकावले आहे. गोलंदाजांना पूरक अशा खेळपट्टीवर आक्रमक होत रोहित शर्माने कसोटीतील सातवे शतक पूर्ण केले. तर रोहितचे चेन्नईतील हे पहिलेच शतक आहे.
भारताविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा २२७ धावांनी दारूण पराभव केला होता. फलंदाजांना आलेल्या अपयशाने रोहित शर्माच्या फॉर्म वर प्रश्न उपस्थित होत होते. मात्र टीकाकारांना प्रत्युत्तर देत रोहितने शतक ठोकले आहे.
भारताने नाणफेक जिंकल्यानंतर शुबमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनी सलामी दिली. गिल शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितने एक बाजू लावून धरली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. मात्र अजिंक्य रहाणेने साथ देत दोघांनी अर्धशतकी भागिदारी उभारली. रोहित शर्माने १३० चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांसह शतक ठोकले.
Comments
Loading…