in

द कपिल शर्मा शो मध्ये ‘लॉटरी’

टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ टीव्हीवर पुन्हा दिसणार आहे.या शो मध्ये अभिनेत्री रोशेल राव एन्ट्री करणार असल्याची माहिती मिळतिये.या वीकेंडच्या अखेरला ती शोमध्ये झळकणार आहे.

मिस इंडिया इंटरनॅशनल राहिलेल्या रोशेल राव बऱ्याच काळापासून अभिनय विश्वात सक्रिय आहे. टेलिव्हीजन आणि चित्रपटांद्वारे ती सतत प्रेक्षकांशी जोडली गेली आहे. रोशेल राव ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अखेरला झळकली होती.कपिलच्या शोच्या यंदाच्या सीजनमध्ये रोशेल पुन्हा एकदा कॉमेडीने प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे.

यावेळी बोलताना रोशेल म्हणाली, “होय, मी कॉमेडीकडे पुन्हा वळतेय. जे मला आवडतं. लोकांना हसवणं सोपं नाही, पण मला ते आवडतं आणि शोमध्ये येणार असल्याने मला माझ्या कुटुंबातच परत आल्यासारखं वाटतंय. या अनिश्चित काळात लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवण्याची संधी मिळतेय, यासाठी मी खूप प्रतिक्षा करत होती. कारण शेवटी, आनंदी क्षण आणि चांगलं हसणं आपल्याला आवश्यक आहे’.

रोशेल राव यंदाच्या वीकेंडच्या अखेरीस तिची एन्ट्री होणार आहे.या शो चा पहिला पाहुणा कलाकार अभिनेता अक्षयकुमार बनला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जनआशीर्वाद यात्रेवरून राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

शिवसेनेची खेळी; नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण