in ,

‘या’ शहरात सोमवारपासून फिरते कोरोना लसीकरण

अनिल ठाकरे | चंद्रपूर : संभाव्य कोरोना लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. जे नागरिक केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत, अशा दिव्यांग, ६० वर्षावरील वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेले व्यक्ती यांच्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून येत्या सोमवारपासून “लसीकरण आपल्या दारी” उपक्रम राबविण्यात येणार आहे. फिरत्या लसीकरणावर भर असणार आहे, अशी माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिली.

मनपाच्या नियमित लसीकरण समन्वय समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीत महानगपालिका क्षेत्रातील ७ आरोग्य केंद्रांमध्ये झालेले एकूण लसीकरण आणि प्रतिकारक्षमता वर्धन (तान्ही बाळे) यांचा पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे सविस्तर आढावा व माहिती घेतली.त्याचप्रमाणे कोरोना लसीकरण आणखी वाढविण्याचे उपाय, नागरिकांच्या डोक्यातील समज -गैरसमज दूर करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. याप्रसंगी मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अतुल चटकी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; मान्सूनचा जोर वाढणार

‘बाप्पा’ साकारले पैठणी शेल्यावर, येवल्यातील पैठणी विणकराची वेगळी कलाकारी