in

परराज्यातून महाराष्ट्रात यायचं असेल तर ‘हे’ बंधनकारक

परराज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक केला आहे. त्याशिवाय बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. हा रिपोर्ट ४८ तास आधी काढलेला असावा असं आदेशात नमूद आहे. दरम्यान, देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील.

याशिवाय कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे. जर हे कार्गो कॅरिअर परराज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा असंही आदेशात नमूद आहे.

औषधं आणि करोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणाऱ्या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी, असं सागंण्यात आलं आहे. हे सर्व निर्बंध १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अशी साजरी होते ‘रमजान ईद’

UPSC Exam; युपीएससीची परीक्षा पुढे ढकलली