in

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर

कोरोना पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांची संवाद साधल्यानंतर शहर पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात करण्यात आली. या नियमावलीमध्ये मूर्ती खरेदी नागरिकांनी शक्य तो ऑनलाईन खरेदी करावी. मूर्तीच्या स्टॉलजवळ गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी गणेश आगमन श्री आगमन व विसर्जन मिरवणुक काढण्यात येऊ नये. श्रींच्या आगमन व विसर्जनच्या विधीसाठी कमीम कमी लोक एकत्र जमतील. गणेश प्रतिष्ठापना सार्वजनिक गणेश मंडळांची मंदिरे आहेत. त्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करावी. अन्यन्य साधारण परिस्थितीत मनपाचे नियम व अटींचे पालन करुन मंडळास छोटे मंडपाकरीता परवानगी दिली जाईल. असे नियम लागू करण्यात आले आहेत.

गणेश पूजा व दर्शन
श्रींच्या आरती व पुजेकरीता जास्तीत जास्त ५ व्यक्तीच हजर राहतील. बाहेरील व्यक्तींना त्यात सहभागी करुन घेऊ नये. गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक द्वारे उपलब्ध करुन देण्याचा मंडळांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कोणाही निमंत्रितांना अगर व्हीआयपींना दर्शनाला परवानगी अगर निमंत्रित करण्यात येऊ नये. पंढरपूर वारीच्या वेळी जसे भाविकांनी घरातूनच दर्शन घेतले. तसे श्री गणेशाचे घरातूनच ऑनलाईन दर्शन घ्यावे.

गणेशोत्सवात दुकांनाना परवानगी नाही
गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादी दुकाने लावण्यास मनाई आहे. उत्सव कालावधीत रस्ता, पदपथांवर खाद्य पदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही.

महत्वाच्या गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्याचे रेकॉडिंग करावे. मंडळांनी जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना प्राधान्य द्यावे. संपूर्ण उत्सवाचे काळात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम,शिबीरे यांचे आयोजनास प्राधान्य द्यावे. गर्दी जमेल असे कोणतेही उपक्रम करु नये.

गणेश विसर्जन
श्रींच्या विसर्जनासाठी मिरवणुक काढता येणार नाही. गणेश मूर्ती विसर्जनाकरीता मंडळाने मंडपाचे शेजारी कृत्रिम हौदाची निर्मिती करुन त्यात गणेश मुर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनाच्या वेळी गर्दी न करता कमीत कमी लोक हजर राहतील, याची दक्षता घ्यावी. घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन नागरिकांनी घरीच अथवा सोसायटीमध्ये बनविलेल्या कृत्रिम हौदात करावे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Madhuri Dixit | अभिनेत्री करणार मराठी मालिकेत पदार्पण,’आंनद गगनात मावेनासा’ झाला…

पैठणमध्ये दमदार पावसाला सुरुवात…