in

दारुबंदीच्या मुद्द्यावरुन रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन विरोधी पक्षाने महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरयांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचा खरपूस समाचार घेतला आहे. रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील भाषणाचा एक जुना व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस दारुबंदी उठवण्याचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देताना ऐकायला मिळत आहे.

दारुबंदी हा तर केवळ एक बहाणा आहे. चंद्रपुरातील काही लोक अवैध दारुविक्रीच्या माध्यमातून मालपाणी मिळवतात. दारुबंदीचा निर्णय उठवल्यास ते मालपाणी बंद होईल, असा देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा आशय आहे. मात्र, ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवल्यानंतर भाजपचे नेते महाविकासआघाडीवर तुटून पडले आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये महापौरांची धड, लसीकरणाबाबत गंभीर बाबींचा खुलासा

‘7 वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास’ काँग्रेसकडून बॅनरबाजी करत भाजपवर हल्लाबोल