in

परराष्ट्र मंत्र्यांचं UN मध्ये वक्तव्य; म्हणाले…

अफगाणिस्तान एका महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे आणि तिथं चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र आले पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानातील मानवतावादी संकटावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती.

‘प्रादेशिक स्थिरतेसाठी याचा विनाशकारी परिणाम होऊ शकतो. भारताने अफगाणिस्तानच्या भविष्यातील संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रीय भूमिकेला सातत्याने पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने भारताचा दृष्टिकोन नेहमीच तेथील लोकांशी असलेल्या ऐतिहासिक मैत्रीमुळे मार्गदर्शन करत आला आहे आणि यापुढेही राहील,’ असं एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

ज्या अफगाणिस्तानी नागरिकांकडे वैध कागदपत्रे आहेत आणि त्यांना अफगाणिस्तान सोडायचे आहे त्यांना सुरक्षितपणे देश सोडण्याची परवानगी दिली पाहिजे, असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आज पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे विसर्जन

प्रवीण दरेकरांच्या कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल