जगातला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. मागच्याच आठवड्यात सचिन रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळत होता. सचिन तेंडुलकर आणि आक्रमक फलंदाज युसूफ पठाण यांच्यानंतर आता स्टार क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथला देखील कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे बद्रीनाथ सुद्धा रोड सेफटी स्पर्धेत सहभागी होता. त्यामुळे वर्ल्ड रोड सेफटी स्पर्धा अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती बद्रीनाथने ट्विट करत दिली. बद्रीनाथ म्हणाला, ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला या आजाराची सौम्य लक्षणे आहेत. मी करोनासंबधित नियमांचे पालन करत असून घरी क्वारंटाइन झालो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य ती काळजी घेत आहे.
Comments
Loading…