निर्माता आणि दिग्दर्शक सचिन जोशी यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मनी लॉन्डरिंग कायदा २००२ नुसार जवळपास ४१० कोटी रुपये बँकेत परस्पर वळवले असल्याचा आरोप जोशी यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना अटक झाली आहे.
२०१७ साली भारतातून फरार झालेल्या विजय माल्ल्याचा गोव्यातील किंगफिशर व्हिला विकत घेतल्याप्रकरणी जोशी हे नाव चर्चेत आले होते.
आयकर विभागानेदेखील गेल्या आठवड्यात सचिन जोशीच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापा टाकला होता. जवळपास तीन ते चार तास अधिकाऱ्यांकडून तपास सुरू होता.
अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती. ईडीने याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणी अटक केली आहे.
Comments
Loading…