in

‘देवेंद्र फडणवीसांकडे तो डेटा कसा आला’

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. तत्कालीन राज्य सरकारला रश्मी शुक्ला यांचा अहवाल दिला गेला नव्हता. मग, देवेंद्र फडणवीसांकडे तो डेटा कसा आला, असा सवाल सावंत यांनी उपस्थित करत फडणवीसांची गिरे तो भी टांग उपर, अशी भूमिका असल्याचा टोला लगावला.

भाजपकडून परमबीर सिंग यांना कव्हर फायरिंग दिलं जात आहे का, असा परखड सवालही सावंत यांनी उपस्थित केला. एपीआय दर्जाचा सचिन वाझे थेट आयुक्त परमबीर यांना भेटतो आणि गृहमंत्र्यांची तक्रार करतो, याचा अर्थ होतो की कोण कोणाजवळ आहे हे लक्षात येतं.वाझे परमबीर यांना थेट रिपोर्ट करत होता, असा आरोपही सचिन सावंतांनी केला.

मूळ मुद्यावरून भटकता कामा नये, असंही सावंत म्हणाले. १० मार्चला एटीएसनं पत्र लिहून तत्कालीन आयुक्त परमबीर यांच्या कार्यालायला डीव्हीआर मागितला होता. यानुसार १० मार्चला डीव्हीआर एटीएसला दिला गेला. अचानक चूक लक्षात आल्यानं २ तासात एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांना फोन गेला. डीव्हीआर नीट दिसत नाही परत पाठवा असं सांगितलं गेलं. त्यामुळे सिंग यांनी परमबीर कार्यालयाला तो डीव्हीआर परत केला. त्यानंतर आजपर्यंत तो डीव्हीआर गायब आहे. याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. तो डीव्हीआर कोणी आणि का गायब केला, याचा तपास व्हावा, अशी मागणी सावंत यांनी केली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sachin Tendulkar Corona : सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह; काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

…’बाबू’ करतात माणसांची होळी, मुंबईत संजय दिना पाटील यांनी झळकावले पोस्टर्स