in

“दाढी वाढवून शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही”

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास प्रतिबंध लागला आहे. येत्या १९ तारखेला शिवजयंती असल्याने त्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. साधेपणाने शिवजयंती साजरी व्हावी, यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मात्र, भाजपाने याविरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. अन्य सर्व कार्यक्रमांना सरकार परवानगी देते. मात्र, शिवजयंतीला ती नाकारण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. परिणामी सरकारकडून शिवजयंती संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांबरोबर करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपाने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी मोदींचा वाढदिवस साजरा करावा. करोनाचा संकटकाळ आहे हे विसरता कामा नये. असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.”

तसेच “शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या हृदयात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली असती तीच महाविकासआघाडी सरकार घेत आहे. शिवरायांचा राजधर्म हाच होता. दाढी वाढवून स्वतःची शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही. असा टोला देखील सावंत यांनी भाजपाला लगावला आहे.”

राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली. आधी फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती. अखेर आता १०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

तारीख की तिथी

अनेक वर्षांपासून शिवजयंती साजरी करण्याबाबत तारखांमध्ये वाद आहेत. सरकारी नियमानुसार दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होते. मात्र, शिवसेना, मनसे यांसारखे पक्ष तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. त्यामुळे जयंतीचा पेच अद्याप कायम आहे. मात्र यंदा जयंतीच्या तारखेपेक्षा किती लोक उपस्थित राहणार या वादाला तोंड फुटलंय. भाजपाने यासाठी महाविकास आघाडीला लक्ष्य केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind Vs Eng : रोहित शर्मा इज बॅक… चेन्नईत दमदार शतक

पंतप्रधान कोणीही असो, राहुल गांधींकडून अपमानच, सीतारामन यांचा हल्लाबोल