in

सचिन वाझे मुंबई पोलीस दलातून बडतर्फ

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना आता पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती.तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता. आधी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. मात्र, त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला.या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ईडीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया…

Chhota Rajan; अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनावर मात