in ,

सचिन वाझेंवर वोकहार्ट रुग्णालयात शस्त्रक्रिया; रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई सेंट्रल स्थित वोकहार्ड रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. या रुग्णालयात वाझे यांची हार्ट सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती वाझेंच्या वकिलांकडून देण्यात आले आहे. त्यामुळेच रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे हा तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. सचिन वाजे याच्या छातीत दुखु लागल्यामुळे मागील १५ ते २० दिवसापासून त्याच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु होते. सचिन वाजे याच्या हृदयात ३ मोठे ब्लॉक निघून आल्यामुळे त्याला शत्रक्रियेची गरज असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी; पाटगाव धरण तुडुंब भरलं

नैवेद्याच्या वेळी बाप्पा आणि गौरीच्यामध्ये पडदा का धरतात?