in

साईवास्तु : सुख, शांत आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी… वास्तुशास्त्र

आज आपण ज्या कुटुंब पद्धतीत राहतो तिथे सदैव सुख़, शांति, समृद्धी आणि समाधान नांदाव हीच अपेक्षा असते. सलोख्याचे नातेसंबंध, सुसंवाद आणि सुसंस्कार कुटुंबात एकसंधपणा जिवंत ठेवत असतात.आपली बौद्धिक पातळी, योग्यता, आवड, गुरुजंनाचे मार्गदर्शन, त्यावर कष्ट करण्याची तयारी, तसेच आपल्या किवा आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा, यावरूनच आपली शैक्षणिक दिशा ठरते. त्यामधून मिळणारं यश आपल करिअर, प्रोफेशन ठरवतं.

एकदा का आपल्या करिअरला सुरुवात झाली की, प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल स्वतःचं घर असावं. पण ते घर किंवा ती वास्तू स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबीयांवर काही परिणाम करेल का, हा विचार बहुतेक कोणी करत नाही. ज्या वास्तुमुळे स्वतःचं व्यक्तिमत्व घडलेलं असतं आणि जी नवीन वास्तू भविष्यात आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य ठरवणारं असते ती वास्तू, शास्त्रीय दृष्टीने योग्य आहे का, एवढा साधा विचार तरी मनामध्ये येतो का ? आपण कर्ज काढून, आपल्या आई वडिलांची साठवलेली पुंजी तिथे वापरून, घेतलेल्या वास्तूमुळे आपल्याला पुढे काय अनुभवास मिळणार आहे, त्याचा यत्किंचितही विचार नसतो.

वास्तू म्हणजे जिथे आपला वास आहे अशी जागा. अशा जागेत आपलं आयुष्य समृद्ध आणि आनंदीत करण्यासाठी असलेलं एक उपायशास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र होय. हे उपायशास्त्र, आपल्या सभोवतालच्या नकारात्मक गोष्टींना दूर करतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतं.वास्तूतील उर्जा क्षेत्रांचा फायदा घेऊन आपलं जगणं, निवास करणं आणि व्यवसाय करणं आपण सुसह्य करू शकतो.

आपल घर किंवा कार्यालय ज्या जमिनीवर उभारलं आहे, तिथे संबंधित उर्जेची कंपनं असतात आणि आपण सतत त्या ऊर्जेशी निगडित असतो. काही ऊर्जा सकारात्मक (आनंददायक प्रभावांसह) तर काही नकारात्मक असतात (भयानक प्रभाव पाडतात). ही ऊर्जाक्षेत्र म्हणजेच वास्तुदेवता होय.

वास्तुशास्त्रात आपल्या वास्तुच्या कुठल्या दिशेशी, कुठल्या तत्वाशी आणि कुठल्या देवतेशी आपण कसे जोडले गेलो, याची सविस्तर माहिती आपल्याला मिळते. प्रामुख्यान आपला प्लॉट तसेच घराच प्रवेशद्वार, स्वयंपाकघर, टॉयलेट्स, देवघर आणि झोपायची जागा या कुठल्या दिशेत, कुठल्या तत्वाशी निगडित आहेत, त्यावरून त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यावर कशा कार्यरत असतात, याची कल्पना येते.

जसं म्हटलं जात की “हर घर कुछ कहता है I”, प्रत्येक वास्तुत ऊर्जा, तत्व आणि दिशा वास करणाऱ्या व्यक्तींशी कशा निगडीत आहेत, ही भाषा समजून घेऊन, वास्तुची मूळ आणि विद्यमान रचना न बदलता ऊर्जाक्षेत्र, तत्व आणि दिशा यांच संतुलन राखून, जन्मपत्रिकेच्या आधारावर राशी, नक्षत्र आणि ग्रह यावर वास्तुशास्त्रीय उपाय करुन आपली वास्तू कशी अनुकूल करता येईल, ते पाहणं म्हणजेच “वास्तू कंसल्टिंग” करणं होय.

कुठलीही वास्तू कधीच 100% अनुपालन केलेली नसते. प्रत्येक दिवशी आपल्या जन्मपत्रिकेतील गोचरीप्रमाणे ग्रह, नक्षत्र, तारे यांच संक्रमण तसंच त्यांच्या दशा, अन्तर्दशा आणि त्याप्रमाणे आपल्या वास्तुमध्ये घडणारे बाह्य आणि अंतर्गत बदल आपल्याला नेहमी नवीन अनुभती देत असतात.

वास्तुशास्त्र, तुमचे प्रारब्ध किंवा भोग नक्कीच बदलू शकत नाही,पण त्याची तीव्रता कमी करुन सुख, शांत आणि समृद्ध आयुष्य जगण्यास मदत करतं…. हे नक्कीच.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘खोटं बोल, पण रेटून बोल’ मुख्यमंत्र्यांचे नवे रूप; ‘बंद दारा’च्या मुद्द्यावरून फडणवीसांचा हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला दणका; फारुख अब्दुल्ला यांच्याविरुद्धची याचिका फेटाळली