in

सैफ अली खानने घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस

राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना , दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आता सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षांवरील आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील सहव्याधी असणाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक सेलिब्रिटीजही ही लस घेताना दिसत आहेत. सध्या अभिनेता सैफ आली खान याचा लसीकरणादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. सैफ अली खान काही दिवसांपासून चर्चेत आहे ते त्याच्या लहान बाळामुळे चर्चेत होता.

यापूर्वी साऊथ सुपरस्टार कमल हसन आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. अभिनेते कमल हसन आणि सतीश शाह यांनी आपला लसीकरणादरम्यानचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. कमल हसन यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, लोकांनी लस घेण्यास लाजू नये. जेव्हा आपली पाळी येईल, त्यावेळी लस टोचून घ्यावी. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने सर्वप्रथम कोरोनाची लस घेतली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जळगाव वसतीगृहातील गैरप्रकाराबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाची गृहमंत्री अनिल देशमुखांना नोटीस

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास एटीएसकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा