in

भारताच्या ‘फुलराणी’ची कथा मोठ्या पडद्यावर ; ‘सायना’ चित्रपटाचा टीझर लाँच

पोस्टर आणि लोगोच्या वादात अडकलेल्या ‘सायना’ या चित्रपटाचा टीझर आज (4 मार्च) प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटात परिणीती बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाबद्दलची माहिती परिणीतीने तिच्या ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्विटला ‘सायनाचा टीझर, आता ट्रेलरही लवकरच!’ असे कॅप्शन लिहिले आहे. सायना नेहवालनेही तिच्या सोशल मीडिया हँडलवर हा टीझर पोस्ट केला आहे.

हा चित्रपट अमोल गुप्ते यांनी दिग्दर्शित केला आहे. 26 मार्च रोजी सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरची सुरूवात ‘जब माता-पिता अपने बेटों को शिक्षित करना चाहते हैं और अपनी बेटियों की शादी 18 साल की उम्र तक करना चाहते हैं, तब उसने बर्तनों के बजाय एक रैकेट उठाया और खुद ही अपना भाग्य बना लिया.’ या संवादाने होते. परिणीती चोप्राचा जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सायनाची कामगिरी आणि तिच्या संघर्षाची कहाणी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाला घेऊन झालेला वाद :
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये उपस्थित असलेल्या लोगोवर प्रत्येकाने प्रश्न उपस्थित केले होते. नेटकऱ्यांच्या मते, पोस्टरवर असलेला लोगो बॅडमिंटन नव्हे, तर टेनिसचा खेळ दर्शवतो. कारण बॅडमिंटनमध्ये शटल कधीच त्या पद्धतीने उडवले जात नाही. पोस्टरमध्ये दर्शवलेल्या हाताचा हावभाव टेनिस सर्व्ह सारखा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता पर्यत IT चे छापे पडलेले बॉलीवूड कलाकार ; ४ थे नाव वाचून बसेल धक्का

Ind vs Eng 4th Test |पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा