in

सलमानचा आगामी चित्रपट ‘अंतिम’ च्या रिलीजसंदर्भात मोठी अपडेट

दबंग सलमान खानच्या चित्रपटाची चाहत्यांना नेहमीच प्रतीक्षा असते. सलमानचा आगामी चित्रपट ‘अंतिम’ सुद्धा सतत चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याची बहीण अर्पिताचा पती आणि अभिनेता अर्पित शर्मासुद्धा दिसून येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झल होत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकला आणखी वाढली होती.

त्यामुळे चाहते मोठ्या उत्सुकतेने या चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा करत आहेत. नुकताच चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘महाराष्ट्रामध्ये सर्व चित्रपटगृहे जर ऑक्टोबर पर्यंत उघडली जात असतील. तर आम्ही हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित करू असं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे.

‘अंतिम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या महेश मांजरेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये सलमान खानचा नवा लूक दिसून येत होता. शिवाय सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असल्याचं पोस्टरवर दिसलं होतं. त्यामुळे चित्रपटात या दोघांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Health Department Exam |विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु – देवेंद्र फडणवीस

जबरदस्त फीचर्सह ‘हा’ स्मार्टफोन लवकरच होणार लाँच