in

सलामान खान, आयुष शर्मा ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी पुण्याला रवाना

सलमान खान आणि आयुष शर्माच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी महेश मांजरेकर पुण्याला रवाना झाले आहेत. अंतिम सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले असून येत्या 26 नोव्हेंबरला ‘अंतिम’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा सिनेमा ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हिंदी रिमेकमध्येदेखील पुणे शहरातील अनेक दृश्ये शूट केली आहेत. त्यामुळेच सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खान, आयुष शर्मा आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर पुण्याला रवाना झाले आहेत.’अंतिम’ सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मांजरेकरांची आता कर्करोगापासून झाली सुटका

महेश मांजरेकरांना अंतिम सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या काळात कर्करोग झाल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी केमोथेरपी सुरू केली. दरम्यान त्यांनी 35 किलो वजन कमी केले.आता कर्करोगापासून सुटका झाल्याने मांजरेकरांना आनंद होत आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजरेकर केमीओथेरपी करत होते. पण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्जरी केली. आवडीचं काम करत असल्याने मांजरेकरांना शूटिंग आणि कर्करोगावर मात करणं सोपं गेलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona virus | देशात दैनंदिन रुग्णसंख्येत घट; 24 तासांत 437 मृत्यू

फडणवीस-राज भेट; ठाकरेंच्या नव्या घरी फडणवीसांची सपत्निक भेट