in

समांतर २ ने कमावले ५ .६ कोटी व्ह्यूज्

कुमार आणि चक्रपाणी यांच्या समांतर आयुष्याचा गुंता आणि एकमेकांच्या आयुष्यावर रंगलेली समांतर- २ ही वेबसिरीज सध्या खूप लोकप्रिय होत असल्याचीे चित्र आहे. या वेबसिरीजने आतापर्यंत ५ .६ कोटी व्ह्यूज मिळवले आहे. ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंत सर्वाधिक पाहिली गेलेली पहिली मराठी वेबसिरीज ठरलीय. वेबसिरीज आल्यानंतर काही दिवसांतच ५ कोटी ६० लाखांवर प्रेक्षकांनी ही सिरीज पाहिली. अभिनेता स्वप्नील जोशीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो, असं स्वप्निलने म्हटलंय. समांतर – २ ने ५ .६ कोटी व्ह्यूज टप्पा ओलांडला आहे. सर्व टीमचे हार्दीक अभिनंदन आणि रसिक प्रेक्षकांचे मनापसून आभार”, असं त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिलंय.

समांतरच्या पहिल्या सिझनच दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. तर दुसऱ्या सिझनचं दिग्दर्शन समीर विध्वंस यांनी केलं. पहिल्या सिझनपेक्षा दुसरा सिझन खूप गाजला. ही सिरीज नामांकित मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या सुप्रसिध्द कादंबरीवर आधारीत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सभेदरम्यानच ग्रामपंचायत पॅनलप्रमुखांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुनर्वसित गावांची वीज कापल्यानंतर गावकऱ्यांची ‘गांधीगीरी’