संभाजी भिडे हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आतापर्यंत त्यांच्या अनेक वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलेलं आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत, असं वक्तव्य भिडे यांनी केलं आहे.
कोरोना हा रोग नाही. जी माणसं कोरोनामुळे मरत आहेत ती जगण्याच्या लायकीची नाहीत. हा मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. कोरोना नाही त्यामुळे लॉकडाउनची गरजच नाही, असंही भिडे म्हणाले.
कोरोना नाही त्यामुळे लॉकडाउन नको. तसंच मास्क वापरण्याचीही काहीच गरज नाही, असंही ते म्हणाले. भिडे यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
Comments
Loading…