ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समीर खान याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. समीर खान हा राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचा जावई असून त्याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) 13 जानेवारी रोजी अटक केली होती. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर गांजा सापडला होता.
एनसीबीने ड्रग्ज तस्कर करण सजनानीला अटक करून 200 किलो परदेशी गांजा जप्त केला होता. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून समीर खानचे नाव समोर आल्याने एनसीबीने त्याला बुधवारी अटक केली होती. या प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालासह इतरही काही जणांना अटक केली आहे. समीर खान याच्यावर एनसीबीने एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गैरकृत्यांना आर्थिक पुरवठा केल्याच्या गुन्ह्याचा यात समावेश आहे. या प्रकरणात एनसीबीने आत्तापर्यंत राहिला आणि शाहिस्ता फर्निचरवाला, मुच्छड पानवालाचा मालक राजकुमार तिवारी यांना अटक केली आहे.
Comments
Loading…