in ,

समीर वानखे़डे प्रकरणात नवा ट्विस्ट; वानखेडेंची पहिली पत्नी मलिकांची नातेवाईक?

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal Offier Sameer Wankhede) यांच्यावर दिवसेंदिवस नवनवीन आणि खळबळजनक आरोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Maharashtra Minister Nawab Malik) यांनी बुधवारी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा करणारे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी थेट समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या निकाहचा एक फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन शेअर केलेला फोटो समीर वानखेडेंचा पहिल्या निकाहचा असून त्यांनी निकाह कधी आणि कुठे केला, याबाबत सविस्तर माहिती देखील दिली आहे.

मात्र आता समीर वानखेडे प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून वानखेडेंची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी या नवाब मलिकांची नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी पुन्हा ईडीचे छापे

Petrol-Diesel Rate Today | किती वाढले आहेत आज इंधन दर?