in

आम्हाला धमकीचे, जीवे मारण्याचे निनावी कॉल येतात – यास्मिन वानखेडे

आर्यन खान प्रकरणामुळे होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे ते जोरदार चर्चेत आले आहेत. या आरोपांसंदर्भातच वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि बहिण यास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत हे सारे आरोप फेटाळले आहेत.

यावेळी समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी मोठा खुलासा केला असून त्या म्हणाल्या की, आम्हाला धमकीचे, जीवे मारण्याचे निनावी कॉल येत आहेत. तसेच आज क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केलं जातं. लटकवून टाकू, जाळून टाकून, मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत. मात्र समीर यांच्या जॉबबद्दल हे पार्ट अँड पार्सल आहे असं वाटतं, असं क्रांतीने सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पैठणच्या क्रीडा कार्यालयाचा अनोखा ‘खेळ’…

सत्ताधारी आणि आयुक्तांनी जनतेची माफी मागावी; पालिकेसमोर मनसेचे आंदोलन