in

Samsung चा Galaxy M62 दमदार स्मार्टफोन

जगातील आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने आपला दमदार स्मार्टफोन लॉन्च केला असून त्या फोनचे नाव Samsung Galaxy M62 आहे. या फोनसोबत 7000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात भारतात हा फोन लॉन्च करण्यात आला. या फोनमध्ये गॅलेक्सी एम62 चा हे रिब्रांडेड व्हर्जन देण्यात आले आहे.

Samsung Galaxy M62 चे फीचर्स

  • या फोनला 6.7 इंचाचा फुलएचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज (मायक्रो कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येणार)
  • या फोन ला दमदार 7000 एमएएचची बॅटरी.
  • हा फोन निळा, काळा आणि हिरवा या तीन रंगात उपलब्ध आहे.

कॅमेरा
Samsung Galaxy M62 मध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेकंडरी कॅमेरा 12 मेगापिक्सल, तिसरा 5 मेगापिक्सल आणि चौथाही 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, यासोबत पंच होल कटआऊटही देण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG : भारताची 145 धावापर्यंत मजल, इंग्लंडचे तीन गडी बाद

विनामास्कविरोधी मोहीम : ‘लोकशाही न्यूज’च्या रिपोर्टला धक्काबुक्की करणाऱ्याचे दुकान सील