in

‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’, महापौरांच्या ट्विटला संदीप देशपांडेंचा टोला

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांच्या १ कोटी लसींसाठी ९ कंपन्या समोर आल्याची माहिती दिली होती. यासंदर्भातील ट्विटवर एका नेटिझननं हे कॉन्ट्रॅक्ट नेमकं कुणाला दिलं? असा सवाल केला होता. त्यावर किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’असं उत्तर दिलं होतं. किशोरी पेडणेकरांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवरुन टोला लगावला आहे.

‘आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर, यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्विटरद्वारे टोला लगावला आहे. तर दुसरीकडे आक्षेपार्ह ट्विटवर महापौर किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण समोर आहे आहे . ट्विट टाकणाऱ्या शिवसैनिकाची हकालपट्टी केल्याची महापौरांची माहिती देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात १२ वीची परीक्षा रद्द

”मुंडे साहेब असते तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं”