in

आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून नगर रोडवरील खड्डे बुजवण्यास सुरूवात

बीड: विकास माने | बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चर्‍हाटा फाटा ते नवगण राजुरीपर्यंत नगर रोडवर मोठ खड्डे पडले असल्याने शहरातील वाहनधारकांना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आता नगरा रोडवरील हे खड्डे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बुजवले जात असून खड्डे बुजवण्याचे काम आज प्रत्यक्षात उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे.

सदर खड्डे दर्जेदार व चांगल्या पध्दतीने बुजवण्याच्या सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. तसेच राजुरी वेस ते चराटा फाटा नवगन राजुरी हा नगर रोड हा रस्ता बीड कराना अभिमान वाटेल असा रस्ता नेशनल हायवे 361एफ अंतर्गत केला जाणार आहे.

यासाठी आ. संदीप भैय्या क्षीरसागर सातत्याने प्रयत्नशील आहेत. यातील काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सदर रस्त्याच्या कामास सुरूवात होणार आहे.

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नगर रोडवर चर्‍हाटा फाटा ते नवगण राजुरीपर्यंत मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना याची मोठी अडचण होवू लागली.

वाहन चालवणे अवघड झाले, सदर खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडे केल्यानंतर मागील काही दिवसातच नगर रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम पाऊस उघडल्यानंतर नॅशनल हायवेच्या अ‍ॅथोरिटीकडून सुरू करण्यात येणार होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी; कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही

शिवसेनेत पोस्टरवार, ठाण्‍यात रामदास कदम यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागले