in

अटकेपार ! इंग्लंडच्या हॉटेलमध्ये सांगलीच्या बाळू लोखंडेची लोखंडी खुर्ची!

संजय देसाई, सांगली | सांगलीत सध्या सोशल मीडियावर बाळू लोखंडे यांची चर्चा सुरू आहे. बाळू लोखंडे यांची लोखंडी खुर्ची मँचेस्टर येथील एका रेस्टोरंटबाहेर दिसून आली. मॅंचेस्टरध्ये रेस्टॉरंट बाहेर चक्क मराठीत नाव आणि गाव लिहिलेल्या अवस्थेत आढलेल्या या लोखंडी खुर्चीने धमाल उडविली आहे. सांगलीतील ही खुर्ची इंग्लंडमध्ये गेली कशी, याबाबत नेटकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी या संदर्भात व्हिडीओ ट्विट केल्यानंतर या चर्चेला उधाण आले होते.

क्रिकेट समालोचक सुनंदन लेले लंडन दौऱ्यावर असताना त्यांनी मँचेस्टर येथे फिरताना तेथे दिसलेल्या बाळू लोखंडेच्या खुर्चीबद्दल पोस्ट केली आहे. या वीस सेकंदाच्या व्हिडीओमध्ये जुन्या काळातील फोल्डिंगची लोखंडी खुर्ची दिसते आहे आणि त्यावर बाळू लोखंडे असे मराठीत लिहिलेले दिसत आहे पुढे सावळज असेही लिहिले आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी चक्क मॅंचेस्टर टाऊनशिप भागात फिरताना आढळलेल्या या खुर्ची बद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

सद्या ही खुर्ची चांगलीच फारवर्ड होते आहे.फेसबुक वरून व्हॉट्सअपवर फिरू लागली आहे. समाज माध्यमात त्यावर चर्चाही झडू लागल्या आहेत. सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात या खुर्चीने धमाल उडविली आहे. आपल्याकडे या खुर्चीवर बसणे ही कमीपणाचे मानले जाईल पण ही खुर्ची अँटिकपीस सारखी हायफाय हॉटेलमध्ये दिसते आहे.

बाळू लोखंडे नेमके कोण आहेत ?

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळजच्या बाळू लोखंडे या मंडप डेकोरेटरची लोखंडी खुर्ची सद्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. याबाबत माहिती घेतली असता ज्या बाळू लोखंडे यांचे नाव आहे ही व्यक्ती सावळज ता तासगाव येथे आजही माया मंडप डेकोरेटर्स या नावाने मंडप डेकोरेटरचा व्यवसाय करत आहेत. हे व्यावसायिक आपल्या वस्तूंवर नावे टाकत असतात तसे बाळू लोखंडे यांनीही टाकले होते. आपल्याकडील लोखंडी खुर्च्या १३ किलो वजन जड असल्याने त्यांनी पंधरा वर्षापूर्वी भंगार मध्ये विकून टाकून प्लॅस्टिक च्या खुर्च्या घेतल्या. मात्र ह्या पैकी दोन खुर्च्या चक्क मँचेस्टर पर्यत कशा पोहोचल्या हे गूढच आहे. आजही त्यांच्याकडे काही तशा खुर्च्या आहेत. बाळू लोखंडे यांच्या खुर्चीचा शोध घेत सुनंदन लेले यांनी सावळज मध्ये बाळू लोखंडे यांच्याशी फोन वरून माहितीही घेतली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चंद्रपुरात ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची नियुक्ती; एकनाथ शिंदेंची घोषणा