in

…’बाबू’ करतात माणसांची होळी, मुंबईत संजय दिना पाटील यांनी झळकावले पोस्टर्स

भांडुपच्या ड्रीम मॉलला गुरुवारी मध्यरात्री आग लागली आणि 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यावरून संशयाची सुई थांबली आहे ती महापालिका प्रशासनावरच. याच अनुषंगाने शिवसेनेचे नेते संजय दिना पाटील यांनी या सर्व घटनेला पालिकेतील अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. तसे फलकच त्यांनी मुंबईत लावले आहेत.

या मॉलमध्ये सनराइज रुग्णालय आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हे या रुग्णालयाचे मालक असल्याचा आरोप, भाजपाने केला आहे. तर, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संजय दिना पाटील यांनी कालच केली होती. तर, आज त्यांनी फलक लावून पालिकेवर आरोप केला आहे. त्यांनी हा मॉल आणि रुग्णालयातील अग्निसुरक्षा उपायांबाबत पालिकेला ऑक्टोबर महिन्यात लिहिलेले पत्र या फलकावर लावले आहे. ‘दलालीचा बाबू करतात माणसाची होळी…’ असा मथळा या फलकाला देण्यात आला आहे. हे फलक ड्रीम मॉलच्या गेट सह आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आले आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘देवेंद्र फडणवीसांकडे तो डेटा कसा आला’

Corona Virus : महापौर म्हणतात, मुंबईत कोणत्याही क्षणी नाइट कर्फ्यू!