in

संजय राठोड ‘वर्षा’ बंगल्यावर; राजीनामा देण्याच्या तयारीत ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राजीनामा पत्र घेऊनच संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान ते राजीनामा देणार आहेत की नाही, याची माहिती आता लवकरच मिळणार आहे.

संजय राठोड यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती, पण त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे संजय राठोड राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत होती. त्यातच मुख्यमंत्री वेळ न देत असल्यानेच ते वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान पुढील काही तासांतच संजय राठोड यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होते की नाही ? आणि वनमंत्रिपदाचा राजीनामा देतात का हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान पोहरादेवी महतांनी राठोड यांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला आहे. पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनी विरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही दिला आहे. महंत जितेंद्र महाराज यांनी ई-मेलद्वारे ही विनंती केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात १४ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा